वनस्पतींच्या वर्गीकरणाचा इतिहास
आज नक्की सांगता येत नाही की आपल्या पूर्वजांना वनस्पतीसंबंधी किती ज्ञान होते, पण एक नक्की की आपले पूर्वज अनुभवाने खाण्यायोग्य व अयोग्य असे अंतर करू शकत होते. त्यांनी विविध वनस्पतींमधील भेद ओळखण्याची भाषाही विकसित केली होती. लिहिण्याची आणि छपाईची कला अवगत झाल्यावर प्राग मनुष्यजातीचा संपूर्ण कायापालट झाला. (ख्रिस्तपूर्व ३७०-२८५) हे वनस्पती विज्ञानाचे पितामह म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्लॅटो आणि अॅरिस्टॉटल यांच्याकडे ग्रीसमध्ये वनस्पतींचे अध्ययन केले. थिओफ्रॅस्टसने अगदी साधेसोपे वर्गीकरण केले. रोपटे, झुडूप आणि वृक्ष त्याचप्रमाणे अपुष्प आणि सपुष्प वनस्पती असाही भेद केला. त्यांनी जवळजवळ ५०० वनस्पतींचे वर्गीकरण त्यांच्या पुस्तकात केले.
त्यानंतर प्लिनी (इस. सन २३-२९) आणि डाओस्कोरिउस (इस. सन ६२-१२८) या दोन रोमन वनस्पती अभ्यासकांनी त्यांचे काम पुढे नेले. भारतात पराशर नावाच्या ऋषींनी ‘वृक्षआयुर्वेद’ या पुस्तकात वनस्पतींचे वैज्ञानिकदृष्टय़ा वर्णन केल्याचे आढळते. असे म्हटले जाते की, पराशरांनी िभगही विकसित केले होते. त्याचा उपयोग वनस्पती निरीक्षणासाठी होत असे.
ख्रिस्ती कालखंडाच्या पहिल्या हजार वर्षांत वनस्पती वर्गीकरणाच्या क्षेत्रात फारसे काम झाल्याचा उल्लेख नाही, पण नंतर मध्ययुगीन काळात अल्बर्ट्स मॅगनस (१२००-१२८०) या प्रसिद्ध पावलेल्या अभ्यासकानी एकबीजपत्रीय वनस्पती आणि द्विबीजपत्रीय वनस्पती आणि संवहनी आणि असंवहनी वनस्पती या वनस्पती वेगळ्या असल्याचा खुलासा करून मांडले.
समुद्रभ्रमण करण्याच्या शोधाने अनेक दर्यावर्दी भ्रमंती करू लागले आणि या भटकंतीमुळे अनेक औषधी वनस्पतींची माहिती जमा झाली. १६०० वे शतक जर्मन अभ्यासकांनी गाजवले. ओटो ब्रुम्फेल्स जेरोम बोक आणि लियोन्हईकुक्स यांनी सुंदर चित्रांच्या मदतीने अनेक वनस्पतींची माहिती मांडली. पण कुठल्याही वर्गीकरण पद्धतीवर भर दिला नाही. फक्त चित्रांसह ग्रंथ प्रकाशित केले.
डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२, office@mavipamumbai.org

Comments
Post a Comment