अश्मयुगीन कलेतील रसायनशास्त्र
#अनुवाद
अश्मयुगीन कलेतील रसायनशास्त्र
अश्मयुगीन मानवाला रसायनशास्त्र अज्ञात होते . तथापी त्या काळातील मानव रंगद्रव्यांचा वापर करून चित्रे किंवा चिन्हे चितारणे शिकला होता .अशी चित्रे आपल्याला जगभरातील गुहात पाहायला मिळतात .प्राचीन मानवाला या रंगद्रव्यांचे ज्ञान कसे बरे झाले असेल ?
जगभरातील गुहेतील कला
ज्यावेळी कधी तुम्हाला मोठी सुटी असेल त्यावेळी तुम्ही भिमबेटका या ठिकाणाला एकदा जरूर भेट द्या .मध्यप्रदेशमध्ये खूप आतवर असणाऱ्या या ठिकाणी अशा अनेक गुहा आढळतात .या गुहांमध्ये प्राचीन मानवाने अत्यंत सुंदर चित्रे रेखाटली आणि रंगविली आहेत तुम्हाला माहित आहे काय की ही रंगचित्रे सुमार ३०००० वर्षे एवढी प्राचीन आहेत ?
भीमबेटकासारख्या गुहा जगाच्या इतर भागातही आढळतात .फ्रान्समधील लासकॉक्स (Lascaux) येथील गुहा जगप्रसिद्ध आहेत परंतु त्याठिकाणी आता पर्यटकांना प्रवेश नाही . दक्षिण आफ्रिकेमधील ब्लॉम्बोस (Blombos),युगांडामधील नायरो(Nyero) मेक्सिको मधील म्युलेज(mulege) आणि ऑस्ट्रेलिया मधील काकाडू(kakadu) आदि ठिकाणीही अशा भितींवर अश्मयुगीन रंगचित्रे असणाऱ्या प्रसिध्द गुहा आहेत
ही रंगचित्रे कशी काढली गेली ?
त्याकाळी आधुनिक तंत्रशुद्ध रीतीने तयार केलेले तैलरंग किंवा जलरंग यांची माहिती मानवाला नव्हती .तथापी अनेक अश्मयुगीन जमातींना रंगीत खनिज रंगद्र्याव्यांच्या वापराची कल्पना होती .आज आपल्याला हे माहित आहे की हे रंगद्रव्ये खनिजांपासून तयार केली जातात उदाहरणार्थ निळे रंगद्रव्य बेरिअम मँगनेट या खनिजपासून , नारिंगी जिप्समपासून , हिरवे रंगद्रव्य मॅलॅकाईटपासून तर पिवळे लिमोनाईट पासून तयार केले जाते . ही सर्व ऑक्साईडे आहेत . लोह धातूची ऑक्साईडे देखील पिवळा ,लाल तसेच तपकिरी रंग तयार करण्यासाठी वापरली जात असत.
गुहांमध्ये काही वेळा ही खनिजद्रव्ये आढळतात (.म्हणूनच ही अश्मयुगीन कला काही विशिष्ट गुहांमध्येच आढळते ) रंगद्रव्य तयार करण्यासाठी खनिजखंड मोठ्या दगडाच्या सहाय्याने कुटून त्याचा बारीक चुरा केला जात असे .हा चुरा दोन दगडांमध्ये दळून त्याची पूड केली जात असे .तयार झालेले रंगद्रव्य नंतर चिखल ,जिप्सम किंवा चुना यात मिसळून त्याची पेस्ट केली जात असे आणि त्या पेस्टने रंग दिला जात असे .रंग लावण्यासाठी प्राण्यांच्या केसापासून तयार केलेळे ब्रश वापरले जात असत ( ३०००० वर्षानंतरही हे तंत्र अजून वापरले जाते ) किंवा रंगाची पेस्ट हाताचा वापर करून भिंतीवर पसरली जात असे .
हे रंग इतके टिकून राहणायचे कारण कोणते ?
जलरंगाने चितारलेल्या चित्रांचा रंग काही दशकानंतर फिका पडू लागतो .असे असताना खडकावरील ही रंगचित्रे इतकी वर्षे टिकून तरी कशी राहिली ?
बहुतेक रंगचित्रे असणाऱ्या गुहा या वाळवंटात जमिनीखाली खूप खोलवर आढळतात .या गुहांतील हवा कालांतराने अत्यंत कोरडी झाली त्यामुळे त्या हवेत बॅक्टेरिया तसेच कवके यांची वाढ होऊ शकली नाही .त्यांची वाढ झाली असती तर त्यांनी हवेत कर्ब द्वि प्राणिल वायू सोडला असता .हा वायू हवेतील आर्द्रते मध्ये विरघळून कार्बोनिक आम्ले तयार झाली असती .काळाच्या ओघात या आम्लांमुळे रासायनिक क्रिया होऊन रंगचित्र खराब झाली असती ज्या गुहातील हवा पुरेशी कोरडी नव्हती त्यातील रंगचित्रांचे नशीब फारसे चांगले नव्हते .ती चित्रे कालांतराने नष्ट झाली .या बाबतीत अजिंठा गुहांचे उदाहरण देता येईल. या गुहा दाट पर्जन्य वनात आहेत .जरी त्या काही शतकांपूर्वीच्या असल्या तरी त्यातील रंगीत चित्रांचे विस्कळीत अवशेष शिल्लक राहिले आहेत ; नाहीतर एकेकाळी ज्या भिंतीं टवटवीत रंगाने समृद्ध होत्या त्या भिंतींवरील रंग आता उडून गेला आहे.
अनुवाद:-श्री.विद्याधर शुक्ला
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Comments
Post a Comment