नासा
#अनुवाद
नासा.
नासाचा आंजरजाल संपर्क हा तुमच्यापेक्षा १३००० पटीनं (मल्टीप्लाईड नाहीये तरी हाच शब्द चपखल वाटतो) अधिक वेगवान (जलद) आहे. जर नासा सारखी एकच संघटना असेल तर तर मग एचडीमधील चमकदार ध्वनिचित्रफिती प्रवाहित तरण्याची काळजीच नाही. अवकाश संघटनाचे शॅडो नेटवर्क, प्रतिसेकंद ९१ गेगाबाईट वा ९१००० मेगाबाईट स्थानांतरीत करु शकतात. तुलनाच करायची झाली तर, ब्रॉडबँडची संपर्कगती संयुक्त राज्यांमध्ये ६.६ मेगाबाईट किंवा अधिक हा १३००० पटीने सावकाश आहे.
शॅडो नेटवर्क काय आहे? ते आंतरजालासारखे (इंटरनेटसारखे)आहे, पण फक्त जगभरातील थोड्या संशोधन सुविधा व संघटनांशी शास्त्रविषयक प्रयोगांशी संबंधित प्रचंड माहीती सामायिक करण्यासाठी जोडले गेले आहे.
दुसऱ्या शब्दांत सांगावयाच झालं तर, हे अर्पानेट असतांना पाठीमागे मूळ आंतरजालासारखं आहे. नासाचं हे शॅडो नेटवर्क दुसऱ्या शब्दात, एनर्जी सायन्स नेटवर्क अथवा इएसनेट म्हणूनही ओळखलं जातं.
फक्त विनाप्रतिक्षा जलद डाऊनलोड करण्याशिवायही, इएसनेटला मोठे शास्त्रीय मूल्य आहे. मानवी जनुकीय आराखडाही ही मोठी जागा व्यापतो पण प्रयोगशाळा आता ती माहीती जवळजवळ विनाविलंब पाठवू शकतात.
दुर्दैवानं इएसनेट हे कोणत्याही वेळेत लवकरच तुमच्या घरापर्यंत पोहचण्याची शक्यता नाहीये. असं असलं तरीही, काही असं तंत्रज्ञान असेल, ज्यामुळं सध्या आपल्या वापरातलं जे इंटरनेट आहे, शेवटी त्यात नक्कीच सुधारणा होऊ शकते.
जो पर्यंत शास्त्रज्ञ त्यांच्या प्रयोगशाळा व त्यांचं तंत्रज्ञान परंपरा आपल्यापर्यंत पोहचवत नाहीत, तोपर्यंत मी गुगल फायबर व त्याच्या गिगॅबाइटचा वेग माझ्या शहरात येण्याची वाट पाहत राहीन.
अनुवाद:-श्री.अमोल शिंपी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#माझीशाळामाझीभाषा

Comments
Post a Comment