निद्रा
निद्रा या विषयावरील संशोधन या विषयाला सध्या अतिशय महत्व येत आहे तुम्ही झोपलेले असता तेंव्हा तुमचा मेंदू मात्र .तुम्हाला उद्याच्या कामकाजासाठी सज्ज करण्यासाठी अनेकविध प्रकारे शरीराची देखभाल करण्याच्या कामात व्यस्त असतो.
आपण दिवसातले ८ तास ,आठवड्यातले ५६ तास, महिन्यातले २४० तास, वर्षातील २,९२० तास म्हणजेच आपले तब्बल 1/३ आयुष्य झोपेमध्ये व्यतीत करतो.
आपण फार जास्त तरी झोपतो किंवा फार कमी तरी !एखाद दुसरा तास जास्त झोप मिळण्यापेक्षा इतर अनेक अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला आपल्याला त्यापेक्षा अधिक रोचक नाहीतर महत्वाच्या वाटतात .परंतु जीवनात व्यायाम आणि योग्य पोषणाचे जे महत्व आहे ,तेच झोपेचे देखील आहे.
निद्रा ही मानवी जाणिवेची नियतकालिक ,नैसर्गिक आणि प्रत्यावर्तनीय हानी असते .झोपेने आपल्या पूर्वजांच्या जीवनामेध्ये तग धरून राहण्यासाठी समायोजक या नात्याने भूमिका बजावली असण्याची शक्यता आहे ..तुमच्या जागृत जीवनाच्या गुणवत्तेवर तुमच्या झोपेची गुणवत्ता थेट परिणाम करते .
झोपेमुळे मेंदूमधील न्युरोन्सना ताजेतवाने होण्यासाठी अवधी मिळतो .त्याचप्रमाणे झोपेमुळे तुमची मानसिक सजगता वाढण्यासाठी ,उत्पादकता वाढण्यासाठी ,भावनिक संतुलनासाठी ,सर्जन शीलता वाढण्यासाठी ,शारीरिक जोम वाढण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठीदेखील सहाय्य होते ;स्मरणशक्ती सुद्धा वाढते.
REM निद्रा ही झोपेच्या चक्रामधील एक अवस्था आहे .या अवस्थेत साधारणपणे सुस्पष्ट स्वप्नांचा अनुभव येतो तसेच आपल्या स्मरणातील दिवसभरातील अनुभवांचे चयन ,वर्गीकरण केले जाते .त्याचप्रमाणे अनुभवांचे संचिकांच्या स्वरूपात जतन केले जाते.
या अवस्थेत सर्जनशीलविचार प्रक्रियेस चालना मिळते .गाढ झोपेमध्ये शरीरातील पिट्यूटरी ग्रंथी वाढीसाठी आवश्यक संप्रेरक शरीरामध्ये निर्गमित करीत असल्याचे आढळून आले आहे .आपण झोपेमध्ये किती वेळ व्यतीत करतो यावर अनुवंशिकतेचा प्रभाव असतो .दूरच्या भविष्यकाळात झोपेच्या कमतरतेचे अनेक दुष्परिणाम संभवतात .त्यामध्ये शरीराची स्थूलता ,उच्च रक्तदाब आणि स्मरणशक्तीची हानी यांचा समावेश आहे. आणि म्हणूनच कोणी असे म्हणत असेल की ‘ या प्रश्नवर आता नाही ,जरा झोपून उठल्यावर उत्तर देतो ‘ तर त्यांना नाही म्हणू नका. त्यांना खुशाल झोपुद्या !

Comments
Post a Comment